प्रभा गृहउद्योग आणि जागृती फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेणार्या कर्तृत्ववान महिलांचा नुकताच सन्मान करण्यात आला. प्रभा गृहउद्योग आणि जागृती फाउंडेशनच्यावतीने हा स्तुत्य उपक्रम अलिबाग- बेलकडे येथील सुरूची रिसॉर्टमध्ये राबविण्यात आला. कष्टाने स्वतःच्या पायावर उभे राहणार्या यशस्वी महिलांसाठी ’रियल सुपर वूमन सन्मान सोहळा – 2025 चे आयोजन रविवारी करण्यात आल होतेे. विविध क्षेत्रातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून अंकिता नगरकर (संशोधक-पुणे), दिपाली सतपाल (यशस्वी उद्योजिका-पंढरपुर), इशिता कुलकर्णी (नृत्यांगना-औरंगाबाद) उपस्थित होते. समाजातील प्रत्येक महिला ही उद्योजिका घडावी यासाठी जागृती फाउंडेशनची टीम अतोनात कष्ट घेते. संपुर्ण महाराष्ट्रात मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणाची चळवळ ही संस्था चालवते. आपल्या स्वतःच्या कष्टाने समाजात एक वेगळा ठसा उमटविण्यार्या महिलांचा सत्कार मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक आणि मानाचा फेटा बांधून करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थापक सौ. बेल्हेकर, अध्यक्षा कृपा आडके, सदस्या सिद्धी जाधव, वृषाली जाधव आणि राजश्री नरुटे यांनी प्रचंड मेहनत घेतली.