| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालय, कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आणि सहा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत.
कडाव येथे या आरोग्य महायज्ञात आठ दिवस आठ वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरे होणार आहेत. 20 मार्च ते 27 मार्च या कालावधीत ही शिबिरे आयोजित केली असून, या आरोग्य महायज्ञ शिबिराचा शुभारंभ कडाव येथे झाला. त्यावेळी युवासेना विधनसभा प्रमुख प्रसाद थोरवे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव, रायगड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुशाग्र पटेल हे प्रमुख उपस्थित होते. या शिबिरात डॉ. विकास पाटील, डॉ. सागर आमरे, डॉ. पीयूष गायकवाड, डॉ. मतीन वाणी, अभिलाषा रामचंद्र, डॉ. करण ठक्कर, डॉ. रुचिता सरकार, डॉ. प्रशांत पवार, डॉ. ललिता लाले आणि आरोग्य पथकाने शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना तालुका प्रमुख सुदाम पवाळी, तालुका संघटक सुनील रसाळ, तालुका संपर्कप्रमुख हर्षद विचारे, विभाग प्रमुख प्रफुल म्हसे, तालुका संघटक श्याम पवाली आणि प्रभाकर भोसले तसेच आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.