| नेरळ | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांनी दहावीचे वर्षे सुरू होण्याआधी आपल्याला करिअर कशामध्ये करायचे आहे हे निश्चित करावे आणि ते उदिष्ट गाठण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावेत असे आवाहन प्रसिद्ध रिसर्च सायंटिस्ट विलास वखारे यांनी नेरळ येथे केले. नेरळ येथे नेरळ परिसर ग्रुपचेवतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नेरळ विद्या मंदिर शाळेत केले होते, त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नेरळ आणि परिसर ग्रुप यांच्या माध्यमातून नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात रिसर्च सायंटिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले विलास वखारे हे मुंबई येथून मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठवर नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे,मुख्याध्यापक पी बी विचवे,उप मुख्याध्यापक के बी भांडे,पर्यवेक्षक चंद्रशेखर गीरासे तसेच नेरळ परिसर ग्रुपचे अध्यक्ष सुनील राणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. नेरळ परिसर ग्रुपचे कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, राजेंद्र विरले, उपाध्यक्ष विलास हजारे,मिलिंद मिसाळ,सचिव द्यानेश्वर भगत,राजू वाघरे, खजिनदार सुनील भागीत,सुनील मोहिते आदींसह ग्रुपचे सल्लागार पंढरीनाथ भागीत,यशवंत दाभणे,चिंधू बाबरे,विष्णू कालेकर,सुनील सोनावले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेरळ परिसर ग्रुपचे सदस्य यावेळी मंगेश तरे, अनिल लदगे, नितीन राणे, संभाजी देशमुख, अरुण देशमुख, सुनील राणे, अशोक गवळी, गोविंद पेमारे, रामदास हजारे, विलास लहाने, रघुनाथ दुर्गे, नथुराम लदगे, अभय शिंदे, उमेश भागीत, कल्पेश मसणे, जयराम ठोंबरे यांनी नियोजन तसेच नेरळ विद्या मंदिरचे हनुमंत भगत, संजय शिंदे यांचे सहकार्य लाभले.