कंपनीच्या पैशांवर कर्मचार्‍यांचा डल्ला

| पनवेल । वार्ताहर ।
कंपनीच्या खात्यातील नऊ लाख 60 हजार रुपयांचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी दोघांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. रायटर बिझनेस सर्व्हीसेस प्रा. लि. या कंपनीत एटीएम कस्टुडीयन म्हणून कामाला असलेले सागर पवार (30) व सूरज पवार (21) यांना उलवे येथील एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी पाठवले होते. उलवे व उरण कोर्ट नाका येथील एटीएम मशीनमधून काढलेली ही रक्कम कळंबोली येथील ऑफिसमध्ये जमा करण्याचे काम दिले होते. त्यानुसार सागर व सूरज हे दोघेही त्यादिवशी सकाळी कंपनीच्या कॅश व्हॅनमधून दोन सुरक्षा रक्षकांसोबत गेले होते. त्यानंतर दुपारी काम संपवून त्यांनी अनलोडींग कॅशची एक बॅग तसेच एटीएम मशीनची उर्वरित लोडिंगची दोन लाख रुपयांची रक्कम कळंबोली कार्यालयात जमा करून ते निघून गेले होते. मात्र, कंपनीतील वॉल्ट कॅश ऑफिसर यांनी रात्री जमा केलेली रक्कम मोजली असता उलवे येथील एटीएम मशीनमधून काढलेली नऊ लाख 60 हजारांची रोख रक्कम त्यात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Exit mobile version