युवकांसाठी रोजगार मेळावा

| रसायनी | वार्ताहर |

तुराड़े सरपंचा रंजना विश्वनाथ गायकवाड़, रिया प्रदीप माली व सदस्यांच्या सहकार्याने, लायस क्लब ऑ़फ पनवेल याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.27)आपल्या परिसरातील युवकांना रोजगाराची सुवर्णंसंधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावेळी अनेक कंपन्या येणार आहेत. यात डिप्लोमा, डिग्री इंजीनिअर, सर्व ट्रेडच्या युवकाना संधी आहे. रोजगार मेळाव्यासाठी युवकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुराडे येथे सकाळी 11 ते 3 वाजता उपस्थित राहावे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच व उपसरपंच यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Exit mobile version