पदवीधर तरूणांना रोजगाराची संधी

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे एनएसडीसी, एआयसीटीई आणि बजाज फिन्सर्व यांच्या सहकार्याने दोन करार करण्यात आले. या करारांतर्गत नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

देशातील प्रमुख कौशल्य विकासाचे स्त्रोत असलेल्या एआयसीटीई (शिक्षण मंत्रालय अंतर्गत) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयांतर्गत) द्वारे देशातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण अशा आर्थिक सेवा समूह असलेल्या, बजाज फिन्सर्वसोबत एकत्र येऊन पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या करारामुळे बँकिंग, आर्थिक आणि विमा प्रमाणपत्र कार्यक्रम कौशल्य विकासाचा 100 तासांचा एक अभ्यासक्रम विकसित केला आहे. या माध्यमातून 20 हजार उमेदवार तयार केले जातील.

तज्ज्ञ मंडळीचे मार्गदर्शन
या अभ्यासक्रमाची निर्मिती ही उद्योग तज्ज्ञ, प्रशिक्षण भागीदार, शैक्षणिक संस्था आणि मानसशास्त्रीय आरोग्य संस्थांचा मदतीने करण्यात आलेली आहे. सध्या सुमारे 350 पेक्षा अधिक महाविद्यालयात 23 राज्य, 100 जिल्हे आणि 160 पेक्षा अधिक गावांमधून कार्यरत असून या माध्यमातून तरुण पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला जाणार आहे.
Exit mobile version