बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण : सौरभ पणशीकर

कोर्लई | वार्ताहर |
स्वयंरोजगार निर्माण करून महिलांनी स्वावलंबी व्हावे. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण करणे हा बँकेचा हेतू असून, महिलांनी विविध व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे बँक ऑफ इंडिया बोर्ली-मांडला शाखेतर्फे महिला बचत गटांना अर्थसाहाय्य वाटप कार्यक्रमप्रसंगी शाखाधिकारी सौरभ पणशीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संपूर्ण देशात बँक ऑफ इंडिया जुलै महिना कृषी मास म्हणून पाळत असून, बोर्ली-मांडला शाखेतर्फे मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील लक्ष्मी महिला बचत गटाला व एकवीरा महिला बचत गटाला दोन लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले. बँक ऑफ इंडियाने रायगड जिल्ह्यात 110 महिला बचत गटांना 1 कोटी 42 लाखांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले असल्याची माहिती शाखाधिकारी सौरभ पणशीकर यांनी यावेळी दिली. यावेळी कोर्लई लक्ष्मी महिला बचत गट अध्यक्षा मेघा सुर्वे, एकवीरा बचत गट अध्यक्षा भारती वाघमारे, सदस्या, बचत गट सहाय्यक रुपाली नवघरकर, रोहित रंजन, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version