गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ११ जानेवारी रोजी कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. परंतु, आता लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाही झाला आहे. त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसत नसल्याचेही सांगितले जात आहे.

Exit mobile version