2 पाकिस्तानींसह जैशच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा
एक जवान शहीद
। जम्मू-काश्मिर । वृत्तसंस्था ।
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या एन्काउंटरमध्ये 6 दहशतवादी मारले गेले. हे सर्व दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसंबंधीत होते. आतापर्यंत 4 दहशतवाद्यांची ओळख झाली आहे. ज्यामध्ये 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक आहेत.
काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, गोळीबारात लष्कराचे तीन जवान आणि एक पोलिस जखमी झाला आहे. उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. उर्वरितांची प्रकृती स्थिर आहे. विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये एका सूचनेवरुन पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना घेरल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. येथे जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या परिसरात आणखी एक दहशतवादी लपल्याचा संशय आहे. सध्या शोध मोहीम सुरू आहे.