| पनवेल | वार्ताहर |
पाच दिवसांपासून नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कोकण भवन येथे सुरू असलेले महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे उपोषण शनिवारी मागे घेण्यात आले आहे. यामध्ये राज्याचे नगर विकास सचिव यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये मागण्या मान्य झाल्याने संतोष पवार व अनिल जाधव यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्यातील नगरपरीषदा नगरपंचायतीमधील प्रदिर्घ काळापासून प्रलंबित आहेत. यातील काही मागण्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्य केल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शासनाचे, नगरविकास विभाग आणि संचालक कार्यालयाचे लक्ष वेधण्यासाठी दि.30 ऑक्टोबरपासून गेले पाच पाच दिवस कोकण भवन येथील संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय कार्यालयासमोर संतोष पवार व अनिल जाधव यांनी उपोषण सुरू केले होते.
नगर विकास विभागाचे मुख्य सचिव के.एच. गोविंदराज यांच्या कक्षामध्ये आयुक्त व संचालक मनोज रानडे व सचिव अशोक लक्कस, उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, अश्विनी कुलकर्णी छाप वाले, सहआयुक्त देवळीकर यांच्यासह संघर्ष समितीच्या नेते डॉ.डी.एल. कराड, ॲड. सुरेश ठाकूर, डी.पी. शिंदे, अनिल जाधव, संतोष पवार, ॲड. सुनिल वाळूजकर, भूषण पाटील यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.





