बॉम्बे डाईंगतर्फे ऊर्जा बचत कार्यक्रम

| आपटा | वार्ताहर |

बॉम्बे डाईंग कंपनीतर्फे ऊर्जा बचत व संरक्षण प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन मोहपाडा प्रिया शाळेत करण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॉम्बे डाईंग कंपनी पॉलिस्टर शाखा पातळगंगा यांच्या माध्यमातून ऊर्जा बचत व संरक्षण करण्यासंदर्भात मार्गदर्शन व प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात ऊर्जा महाव्यवस्थापक बी. पी मिश्रा व ऊर्जा व्यवस्थापक निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका सौ. जोसेफ मॅडम यांच्या सहकार्याने कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला. कार्यक्रमात प्रश्‍नमंजुषा या उपक्रमामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात बॉम्बे डाईंग कर्मचारी व शालेय कर्मचारी, शिक्षक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version