। आपटा । वार्ताहर ।
बॉम्बे डाईंग कंपनीतर्फे नुकतेच राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहमध्ये कामगार व इतर कर्मचारी वर्गासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात निबंध, चित्रकला, प्रश्नमंजुषा व क्रॉस वर्ड या स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. त्यांच्या पाल्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन मोहोपाडा येथे करण्यात आले होते. तसेच, ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन या विषयावर लोधीवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेट स्कूल येथे ऊर्जा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, अमित चिलवे (ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, बॉम्बे डाईंग कंपनीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी रजनेश दत्त, उपाध्यक्षक बी. पी. मिश्रा व ऊर्जा विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक निलेश जाधव हे उपस्थित होते.