इंग्लंडने केला वेस्ट इंडिजचा पराभव

| वेस्ट इंडीज | वृत्तसंस्था |

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन केले आहे. आणि 6 डिसेंबर (बुधवार) रोजी अँटिग्वा येथील रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. सॅम करन आणि गस ऍटकिन्सन यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्यांनी हा सामना सहज जिंकला. या सामन्यात सॅम करनने तीन तर गस ऍटकिन्सनने दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मालिकेत सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आणि यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय संघाच्या हिताचा नव्हता. सुरुवातीला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अशा स्थितीत वेस्ट इंडिजचा संघ लगेचच डबघाईस आला. पहिल्या सात षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या 23 धावांत चार फलंदाज बाद अशी होती.

कर्णधार शाई होप आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्यात पाचव्या गड्यासाठी 129 धावांच्या भागीदारीने यजमानांना नाजूक परिस्थितीतून वाचवले. होपची 68 चेंडूत 68 धावा केल्या तर रदरफोर्डची 83 चेंडूत 60 धावांची खेळी केली. यामुळे वेस्ट इंडिज सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. वेस्ट इंडिजचा संघ 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 39.4 मध्ये 202 धावांवर गडगडला. 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 32.5 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला. फिलिप सॉल्ट आणि विल जॅक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 35 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी सहाव्या षटकात 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून तंबूत परतलेल्या सॉल्ट बाद झाल्याने मोडली . त्यानंतर 11व्या षटकात जॅक क्रोली वैयक्तिक 03 धावांवर बाद झाला. यानंतर 13व्या षटकात बेन डकेट 03 धावांवर बाद झाला. त्यानंतर शतकाकडे वाटचाल करणारा सलामीवीर विल जॅक 20 व्या षटकात 72 चेंडूत 73 धावा काढून बाद झाला. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. यानंतर कर्णधार जोस बटलर आणि हॅरी ब्रूक यांनी पाचव्या गड्यासाठी 78 चेंडूत 90 धावांची भागीदारी केली. आणि संघाला विजयापर्यंत नेले. बटलरने 45 चेंडूत नाबाद 58 आणि ब्रूकने 49 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या.

Exit mobile version