तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव
| लंडन | वृत्तसंस्था |
तिसर्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच 2-0 असा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. आता मालिका 2-1 अशी आली आहे. लीड्सवरील तिसर्या अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 251 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडने हे आव्हान तीन विकेट्स राखून पार करत मालिकेतील पहिला विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयात कर्णधार बेन स्टोक्सने देखील मोलाचे योगदान दिले आहे. त्याने पहिल्या डावात 80 धावांची आणि दुसर्या डावात 13 धावांची खेळी केली. स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडने चौथ्या डावात 251 धावा चेस केल्यानंतर कर्णधार म्हणून स्टोक्सने महेंद्रसिंह धोनीचे एक मोठे रेकॉर्ड मोडले.
इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने दुसर्या डावात केलेल्या 77 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 251 धावांचे आव्हान 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. इंग्लंडने 251 धावांचे आव्हान पार केल्यानंतर बेन स्टोक्सने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे मोठे रेकॉर्ड मोडले. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने तब्बल पाचव्यांदा 251 धावांचा पाठलाग करत कसोटी जिंकली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा चेस करण्याचा विक्रम हा यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नावावर होता. धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 4 वेळा चौथ्या डावात 250 धावांपेक्षा जास्त धावा चेस केल्या होत्या. स्टोक्स या विजयामुळे आनंदी झाला असून तो म्हणाला की, मअजून एक अटी-तटीचा सामना. सामना जिंकून आम्ही आव्हान जिवंत ठेवल्याने आनंद झाला आहे. मनाणेफेक जिंकली आम्ही पहिल्यांदा फलंदाजीही करू शकलो असतो मात्र आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी चांगली होती. मिचेल मार्शने चांगली फलंदाजी करत सामना जिवंत ठेवला. आऊटफिल्ड फास्ट होती. आमच्याकडे वूड आणि वोक्स होते. असे तो मोठ्या अभिमानाने बोलला.
मआम्ही निवडलेल्या संघाने सामन्यावर छाप पाडली. आम्हाला हे खेळाडू सामन्यावर कसा प्रभाव पाडू शकतात हे पहायचं होतं. मला वोक्सने खूप दिवसांपासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही याची जाणीव नव्हती. मात्र त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. आठव्या क्रमांकावर त्याच्यासारखी फलंदाजी करणार कोणी असणे यामुळे आम्हाला मदत झाली. ज्यावेळी तो पुढचा सामना खेळले त्यावेळी देखील तो अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे.
बेन स्टोक्स, इंग्लंड कर्णधार