इंग्लंडचे वादळ पुन्हा मैदानात घोंघावणार

बेन स्टोक्सचा निवृत्तीचा निर्णय मागे

| लंडन | वृत्तसंस्था |

इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी तो निवृत्ती निर्णय मागे घेणार आहे. त्याने याआधी एकदिवसीय सामन्यामधून निवृत्ती घेतली होती मात्र, आता संघाला गरज असल्याने त्याने हा निर्णय मागे घेणार असल्याचे कळते. तसेच, त्याने आयपीएलबाबतही मोठे विधान केले आहे. टेलिग्राफफ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, स्टोक्स यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलपासून दूर राहू शकतो जेणेकरून कामाचा बोजा हलका करता येईल. स्टोक्स आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. या मोसमातही तो चेन्नईकडून मोजकेच सामने खेळू शकला.

टेलिग्राफफच्या वृत्तानुसार, यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकादरम्यान इंग्लंडला विश्वचषक ट्रॉफी पुन्हा जिंकण्यासाठी स्टोक्सची गरज असल्याने त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. याआधी त्याने वन डे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, भारतात होणारा विश्वचषक तो खेळणार आहे. याबाबत त्याने संघात पुनरागमन करणार असल्याचे काही संकेत दिले आहे. निवृत्तीबाबतचा तो यू-टर्न घेऊन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी परतण्यास तयार आहे. बेन स्टोक्स त्यासाठी पुढच्या हंगामात आयपीएलमधून बाहेर होणार आहे अशी चर्चा सुरु आहे. स्टोक्स विश्वचषक खेळण्यास उत्सुक आहे आणि जोस बटलरने त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला पुढे जाण्यास परवानगी दिल्यास इंग्लंडच्या विश्वचषक संघात त्याचा समावेश होऊ शकतो. 2019 मध्ये इंग्लंडने विश्वचषक जिंकला होता, त्या विजयाचा खरा शिल्पकार हा बेन स्टोक्स होता.

आयपीएलपासून दूर राहू शकतो
पुढील वर्षी इंग्लंड भारताचा दौरा करणार आहे आणि त्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार असून मार्चमध्ये संपणार आहे. अशा परिस्थितीत कामाच्या बोजामुळे तो चेन्नई सुपर किंग्सची 16 कोटींची मोठी रक्कम नाकारण्याच्या तयारीत आहे. स्टोक्सने मे अखेरपर्यंत दोन महिने आयपीएल खेळल्यास त्याला जवळपास पाच महिने भारतात घालवावे लागतील, जे त्याच्यासाठी शक्य होणार नाही. याबाबत त्याने अधिकृत अशी माहिती दिलेली नाही. स्टोक्सने 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याच्या संघाला ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. अंतिम फेरीत तो सामनावीर ठरला. न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्या खेळीने इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले. स्टोक्सने 2019 विश्वचषकात 11 सामन्यात 465 धावा केल्या होत्या. गरज पडल्यास स्टोक्स मधल्या फळीत मुख्य फलंदाज म्हणून खेळेल, असेही शक्यता वर्तवली जात आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो अद्याप गोलंदाजी करू शकलेला नाही, त्यामुळे तो फलंदाज म्हणून खेळू शकतो.

Exit mobile version