| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील युनायटेड इंग्लिश स्कूल मोर्बा या शाळेने तालुक्यातील बोरवाडी येथील माऊली वृध्दाश्रमाला बुधवारी (दि.12) भेट दिली. यावेळी युनायटेड इंग्लिश स्कूल मोर्बाच्या मुख्याध्यापिका झोया बडे, शिक्षक वफा गैबी, फायझा मुल्ला, अक्षय पवार, रतिका गमरे व शाळेतील इयत्ता सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींशी संवाद सांधला. त्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांच्या दैनंदिन जीवनातील प्रवास व आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हे वृद्ध लोक व्यतित करीत असलेले जीवन याबाबत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत मनोरंजनात्मक खेळ खेळून एका आगळ्यावेगळ्या अनुभवाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी वृद्धापश्रमातील व्यक्तींनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसमवेत आपल्या आयुष्याची कहाणी कथन केली. त्यावेळी या सर्वांना भरभरून आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले ग्रिटिंग कार्ड वृद्ध व्यक्तींना भेट देऊन वृध्दाश्रमाला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेश देत एक बदामाचे वृक्ष शाळेतर्फे भेट देण्यात आले.







