नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

| रोहा |वार्ताहार |

रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी 106 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 40 रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. रोहा सिटिझन फोरमने गेल्या दीड वर्षभरात 1107 नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे.

रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट सातत्याने ‘अंधत्वाकडून दृष्टीकडे’ हे मोतीबिंदू मुक्त रोहा अभियान राबवत आहे. ट्रस्ट मार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते व तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केली जात असल्याने गरजूंना दिलासा मिळत आहे. ग्रामदैवत श्री धावीर मंदिराच्या भक्त निवासात शिबीर संपन्न झाले. आजच्या शिबिरातिल एकूण 40 रुग्णांची आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप देखील करण्यात आले. शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ. इशा निरगूडकर, सिद्धी मोरे, अक्षिता चिकणे, अवंतिका रिकामे, विश्वनाथ पाटील, सागर पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख, मिलिंद अष्टिवकर, महेश सरदार, संदीप सरफळे, श्रीकांत ओक, इल्यास डबीर, दिनेश जाधव, दिनेश मोहिते, अहमद दर्जी, उस्मान रोहेकर, परशुराम चव्हाण, राजेश काफरे, निलेश शिर्के, शैलेश रावकर, अमोल देशमुख, सिद्धेश ममाले, समिधा अष्टिवकर, रिद्धी बोथरे, बिलाल मोरबेकर आदींनी परिश्रम घेतले. रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version