| माणगाव | वार्ताहर |
माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार दि. 12 जुलै बाळकृष्ण मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅन्ड जवळ माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 68 रुग्णांची तपासणी करून 18 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सदरचे शिबीर हे दर महिन्याच्या एका बुधवारी होत असते .
या शिबिरात आतापर्यंत 850 हुन अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत. माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, रोहा आदी तालुक्यांतील जवळपास गेल्या वर्षभरापासून शिबिरात 850 हुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजयशेठ मेथा, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा, सुप्रिया शिंदे यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक प्रकाश पाटील, अपर्णा हरिंद्रनाथ, अक्षता पार्टे, अवंतिका गलांडे यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले.