| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाड रोहा लायन्सक्लब व स्थानिक सुरगड संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरगड रहाल परिसर तसेच गडाच्या परिसरातील शिव मंदिर तसेच हनुमान मंदिर परिसरच्या आजु बाजूला तसेच वैजेनाथ गाव खांब परीसरात शंभर विविध प्रकारच्या झाडांची लागवड तसेच वेगवेगळ्या रंगी बेरंगी फुलांच्या बी बियाणांची लागवड करण्यात आली.
गेली तीन वर्ष सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत रविवारी 9 जुलै रोजी सालाहाबाद प्रमाणे यावर्षी झाडे लावा झाडे जगवा, चला आपण पर्यावरण वाचवू या,वृक्ष लागवडीची लक्षवेधी संकल्पना हाती घेऊन कोलाड परीसर तसेच रस्ता दुतर्फा मार्ग शाळा परीसर वैकुंठ धाम परीसरात विविध प्रकारची झाडे तसेच काही ठिकाणी रंगी बेरंगी फुलांच्या बी बियाणांची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी डॉ. सागर सानप, रविंद्र घरत, पराग फुकणे, अजय भोसले, नरेश बिरगावले, अनिल महाडीक, रविंद्र लोखंडे, नंदकुमार कळमकर, डॉ. श्यामभाऊ लोखंडे, गजानन बामणे, अलंकार खांडेकर, दिनकर सानप, महेश तुपकर तसेच स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचे सर्व शिलेदार मावळे, पर्यावरण प्रेमी आदींनी परिश्रम घेत या झाडे लागवड व बियाण्यांची लागवड केली