| नेरळ| वार्ताहर |
नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साई मंदिर ते बोपेले कोल्हारे गाव फाटा या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरु केले नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डेच खड्डे तयार झाले होतेचे कृषीवलने 6 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावेळी जय मल्हार रिक्षा चालक मालक संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यावरील खड्डे न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या रस्त्यावरील खड्डे हे कोणत्याही वाहनांच्या ये-जा करण्याने आजूबाजूने चालणारे वाटसरू यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडत असते. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना वाहनचालक यांना वाटसरू यांच्याकडून शिव्या शाप ऐकून घ्यावे लागत आहेत. स्थानिक प्रवासी वाहने यांना रस्त्याने ये-जा करताना खड्ड्यांनी त्रस्त केले असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेरळ विकास प्राधिकरण या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण कधी करणार?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याबाबत जय मल्हार रिक्षा संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा दिला होता. या बाबत दैनिक कृषीवल ने स्थानिकांच्या मागणीनुसार वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानांतर मंगळवार 11 जुलै रोजी कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून साई मंदिर ते बोपेले मार्गावरील खड्डे भरण्याची कामे हाती घेतली आहेत.