पालिकेच्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद

अवघ्या दोन दिवसात 377 जागांसाठी सडेचार हजार अर्ज

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिकेतर्फे गट ‌‘अ’ ते गट ‌‘ड’मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवसोपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसोत साडेचार हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

ही भरती प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील पदांकरिता होणार आहे. तुलनात्मक स्पर्धेतून निवड प्रक्रिया होण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना www.panvelcorporation.com, https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर 17 ऑगस्टपर्यंत रात्री 11.55 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. दि.13 जुलै ते17 ऑगस्टदरम्यान उमेदवारांना त्यांचे अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांना भरती प्रक्रिया संदर्भात काही अडचण असल्यास 022-27458042, 27458041 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यालय उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे.

भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून, कृपया नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने, पदाधिकाऱ्याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांच्याविरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल करावी.

गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका
Exit mobile version