विक्रीतून आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहाचे साधन
। उरण । वार्ताहर ।
पावसाळा सुरु झाला की औषधी, गुणकारी रान माळावरील विविध पालेभाज्या उरण शहरात विकायला आल्या आहेत. या भाज्यांना मागणी खूप असते. उरण शहरातील राजपाल नाका, आनंद नगर कॉर्नर येथे या भाज्या मोठ्य प्रमाणत विकायला आल्या आहेत. नागरिक भाज्या खरेदी करताना दिसत आहेत.
या भाज्या चवीला रुचकर असतातच शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असल्याने या भाज्यांना महत्त्व असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगल अथवा माळरानावर रानभाज्या उपलब्ध होत असल्याने आदिवासी ठाकूर महिला पुरुषवर्ग सकाळी जंगल व माळरानात जाऊन रानभाज्या गोळा करतात. त्या खवय्यासाठी बाजारात आणून त्यांची विक्री करत त्यापासून मिळणार्या पैशामध्ये आपल्या कुटुंबाचे आदिवासी बांधवाचे उदरनिर्वाहचे साधन बनले आहे. या भाज्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने आदिवासींना रोजगार मिळाला आहे.
आम्ही पावसाळ्यात रानभाज्या गोळा डोंगरात जातो. दिवसेंदिवसया भाज्या दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. या भाज्या महाग असल्या तरी लोक खरेदी करतात.
वासंती कातकरी, कातकरी वाडी (उरण)
पहिल्याच पावसात येणार्या रानभाज्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांचा कल हा रानभाज्या खरेदीकडे असतो. आम्ही दरवर्षी भाजी खरेदी करतो. पावसाळ्यातील मिळणारी भाजी ही बिन खताची असते. यामुळे उरण तालुक्यातील शहरात मोठ्या प्रमाणात रानभाज्याची विक्री होत असून याद्वारे आदिवासी ठाकूर लोकांना चांगला रोजगार उपलब्ध होतो.
हर्षला भोंबळे, गृहिणी, बालई