माथेरानमध्ये पर्यटकांची चौकशी करूनच प्रवेश

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान येथे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुरु झाली आहे. शासनाने कोरोना आणि ओमिक्रोन व्हेरियंट बाबत नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पर्यटनस थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची कसून चौकशी करूनच शहरात प्रवेश दिला जात आहे. दरम्यान दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असून कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून दस्तुरी नाका येथे केले जात आहे.
कोरोना आणि ओमिक्रोनचा संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने पर्यटनस्थळे यांच्यासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळी येणार्‍या सर्व पर्यटकांना दोन डोस घेतले आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार माथेरान येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांच्यासाठी दस्तुरी नाका येथे तपासणी पथक तयार करण्यात आले आहे. तर तेथे पर्यटकांचे टेम्परेचर आणि त्यांची थर्मल स्कॅनिंग देखील केली जात आहे.
माथेरान पालिकेकडून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने लावलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचा आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न पालिका करीत आहे अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे. तर शहरातील वेगवेगळ्या प्रेक्षणीय ठिकाणी पर्यटक मास्कचा वापर करतात किंवा नाही यांची खबरदारी देखील पालिका घेणार असून माथेरान मध्ये नो मास्क, नो एन्ट्री या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावली केली जात आहे.

Exit mobile version