हातमाग कापड प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

| अलिबाग | वार्ताहर |
पेण व अलिबाग येथे आयोजित केलेल्या हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील नामांकित कापड उत्पादन संस्थांचे सहभागी असलेले हे आगळे वेगळे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात सोलापुरातील हातमागावरील कॉटन साडी, इरकली साडी, पटोला खादी साडी, मदुराई सिल्क साडी, मदुराई कॉटन साडी, खादी कॉटन साडी, सिल्क साडी, गडवाल साडी, सेमी पैठणी बाटिक प्रिंटेड साडी, धारवाड साडी, बेळगाव साडी, सर्व प्रकारचे साड्या उपलब्ध आहेत.

सोलापुरातील चादर, बेडशीट, सतरंजी, पंचा टॉवेल, डोअर मॅट, वुलन चादर, लुंगी वॉल, हँगिंग हॅन्ड बॅग गाऊन, कॉटन शर्ट कुर्ता, बंडी याशिवाय हातमागावरील उत्पादन झालेले असंख्य प्रकार एकच ठिकाण खरेदी करता येणार आहेत. हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड हे अत्यंत चांगल्या दर्जाचे असल्याचे मत पांडुरंग पोतन यांनी व्यक्त केले. हे प्रदर्शन 21 ऑगस्टपासून सुरू झाले असून, 7 सप्टेंबरपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुल आहे. तरी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version