। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग शहरातील काँग्रेस भवन अलिबाग अर्बन बँकेच्या शेजारी कर्वे रोड काँग्रेस भवन हॉल येथे दिवाळी सणानिमित्त आयोजित केलेल्या हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीला ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील नामांकित कापड उत्पादन संस्थांचे सहभागी असलेले हे आगळे वेगळे प्रदर्शन आहे सुप्रसिद्ध सोलापुरातील हातमागवरील कॉटन साडी, इरकली साडी, पटोला साधी साडी, मदुराई सिल्क साडी, मदुराई कॉटन साडी, खादी कॉटन साडी, सिल्क साडी, गडवाल साडी, सेमी पैठणी बाटिक प्रिंट प्रिंटेड साड्या साडी धारवाड साडी, बेळगाव साडी, कॉटन नऊवारी साड्या सर्व प्रकारचे साड्या उपलब्ध आहे. सुप्रसिद्ध सोलापुरातील चादर, बेडशीट, सतरंजी, पंचा टॉवेल, डोअर मॅट वुलन, चादर, लुंगी वॉल, हँगिंग, हॅन्ड बॅग, गाऊन टॉप, लेगिज, कॉटन, शर्ट, कुर्ता बंडी, याशिवाय हातमागावरील उत्पादन झालेले असंख्य व्हरायटी एकच ठिकाणे पाहण्याची संधी अलिबाग कराना प्राप्त झाले आहे, असे आयोजक पांडुरंग पोतन म्हणाले. हे प्रदर्शन 01 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे प्रदर्शन वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे.