| कोर्लई | प्रतिनिधी |
राज्याचे महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व मुरुड प्रांताधिकारी दुर्गा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत मुरुड तालुक्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार आदेश डफळ यांनी शासन निर्णयातील सूचने प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात महसुल दिन साजरा करणे, शासकीय जागेवरील सन 2011 पुर्वीपासून असलेल्या रहिवाशी अतिक्रमण धारकाच्या याद्या तयार करणे व अतिक्रमण जागांचे पट्टेवाटप करणेबाबतची कार्यवाही, पाणंद शिवरस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, तालुक्यातील मंडळ निहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर, विशेष सहाय्य योजनेतील डी.बी.टी. न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डी.बी.टी. करून अनुदानाचे वाटप, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व धोरणांची अंमल बजावणी करून जनजागृती करण्यात आली. यावेळी मुरुड तालुक्यातील महसुल सप्ताहाला लोकप्रतिनिधी व नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.







