कोल्हापूर | प्रतिनिधी |
कोल्हापूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बाबूराव पाटील उर्फ बी.वाय.पाटील यांचे 7 ऑक्टोबर रोजी वार्धक्याने निधन झाले आहे. त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी रक्षा विसर्जित न करता स्वत:च्या बंगल्याच्या परिसरात बागेमध्ये पसरवून पर्यावरण व नदी प्रदूषणाचा संदेश दिला. तसेच याद्वारे त्यांच्या मुलांनी बी.वाय.पाटील यांना आगळीवेगळी श्रद्धांजली समर्पित केली.बी.वाय.पाटील शिवाजी विद्यापीठ,सांगोला येथील शेतकरी सूतगिरणीसह अन्य साखर कारखान्यांच्या बांधकामे यशस्वीपणे पूर्ण केली.