। रायगड । खास प्रतिनिधी ।
12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण राष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने युवकांच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव व प्रोत्साहन मिळावे, यासाठी वीर मुरारबाजी देशपांडे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता युवकांसाठी उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्ती तसेच मार्गदर्शन करण्यासाठी यशस्वी उद्योजक आणि व्याख्याते उपस्थित राहणार आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या माजी प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालक यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्रा. एन.एस. पुरकर यांनी केले आहे.