जंजिरा किल्ल्यात प्रवेश शुल्क माफ

Murud-Janjira Fort situated on an oval-shaped rock off the Arabian Sea coast near the port town of Murad, 165 km or 103 mi south of Mumbai

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड राजपुरी येथील समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रोज शेकडो पर्यटक ये-जा करित असतात. येणा-या पर्यटकांकडून किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क घेतला जात असतो. हाच प्रवेश शुल्क उद्या ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन येणाऱ्या पर्यटकांना पुरातत्व विभागातर्फे आकारले जाणारे प्रवेश शुल्क महिला सन्मानार्थ आबाल वृद्धांना पुर्णतः माफ असणार आहे अशी माहिती  सहाय्यक संवर्धक-पुरातत्व विभाग अलिबाग-बजरंग. जी. येलीकर यांनी दिली आहे. किल्ले रायगड, कुलाबा आणि जंजिरा या किल्ल्यांवर गतवर्षी केवळ महिलांनाच प्रवेश शुल्क आकारले गेले नव्हते परंतु या वर्षी महिलांसह पुरुषांनाही ही सवलत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Exit mobile version