पंतच्या ताफ्यात नव्या भिडूची एन्ट्री

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

ऋषभ पंतच्या कमबॅकनंतरही दिल्लीला यंदाच्या हंगामात प्रभावी कामगिरी करता आली नाही. दिल्लीला पाच सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला. चार पराभव स्विकारणार्‍या दिल्लीसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्लीने हॅरी ब्रूकच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. लिझाद विल्यम्स हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू दिल्लीसोबत लवकरच जोडला जाणार आहे. आयपीएल आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने ट्विटवर अधिकृत माहिती दिली आहे.

अष्टपैलू लिझाद विल्यम्स हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाकडून 2021 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. लिझाद उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो तर, उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 371 धावा चोपल्या आहेत. तर, 16 बळी घेतले आहेत. लिझादच्या आगमानामुळे दिल्लीची कागदावरील ताकद नक्कीच वाढणार आहे. पण लिझाद कशी कामगिरी करतो, याकडेही सर्वांच्या नजरा लागतील.

Exit mobile version