। उरण । वार्ताहर ।
उत्तर रायगड जिल्ह्यातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर तसेच महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. सर्व नवीन कार्यकर्त्यांचे शर्मिला ठाकरे, स्नेहल जाधव आदींनी स्वागत केले. यावेळी केसरी पाटील, अतुल चव्हाण, दीपक पाटील, दशरथ मुंडे, विश्वनाथ पाटील, संदेश ठाकूर, रामदास पाटील, रेखा पवार, स्वरूपा सुर्वे, कविता म्हात्रे, स्नेहल बागल, सोनल कदम, दशरथ मुंडे उपस्थित होते.