राष्ट्रवादीला रामराम! चंदरगाव ग्रामपंचायत सदस्याचा शेकापक्षात प्रवेश

। पेण । प्रतिनिधी ।
महागाव शेकाप सरपंच भास्कर भालचंद्र पार्टे यांच्या सहकार्याने माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत चंदरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य खंड्या गोविंद मरकड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत मंगळवारी शेकापक्षात आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. धैर्यशील पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन पक्षात स्वागत केले.

पेण शेकाप कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी जि.प.सदस्य डी.बी. पाटील, नीलिमा पाटील, स्मिता पाटील, चिटणीस संजय डंगर, संदेश ठाकूर यांच्यासह पाली येथील तुलाजी मटकर, बाळू गोरीवले, दत्ता घोगले, जीतू गोरीवले, तुकाराम चव्हाण, संतोष खर्डे, गजानन घोगले, धनेश गोरीवले उपस्थित होते. यावेळी शेकाप सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version