| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आणखी एका अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्राचार्यांनी युवासेनेमध्ये प्रवेश केला आहे. युवासेना महाविद्यालय युनिटचे महारष्ट्र प्रदेश सचिव प्रा. वैभव मोहिते यांच्या पुढाकाराने आणखी एका महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि महाविद्यालय विभाग प्रमुखांनी युवासेनेमध्ये प्रवेश केला. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना सचिव यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले.
कर्जत तालुक्यातील यादवराव तासगावकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट प्राचार्य डॉ. राजु सैरिसे, उपप्राचार्य स्वप्नील बरडे तसेच या महाविद्यालयाचे विभाग प्रमुख समीर पाटील आणि काही प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल जवंजळ, स्वप्नील मुकादम, अमित म्हस्कर, प्रशांत कावळे, नरेश पाटील, धनंजय भासे यांनी युवासेना प्रवेश केला. युवासेनेचे कॉलेज युनिट महाराष्ट्र सचिव प्रा. वैभव मोहिते यांच्या प्रयत्नातून झालेल्या पक्ष प्रवेशप्रसंगी शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या शीतल देवरुखकर आदींनी त्या सर्वांचे स्वागत केले. यावेळी युवासेना सचिव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. याच ठिकाणी सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे मुंबई विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी युक्ता पाटील तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी युवासेना युनिटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या सर्वांचे शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून घेतला.
युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, महाराष्ट्र राज्य कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी, कॉलेज कक्ष सचिव हृतिक ओझा, प्रणय वारगे, कॉलेज कक्ष रायगड लोकसभा सक्रिय सदस्य मनीष पवार प्रणित दाभाडे, आशिष मिणमिणे आदी उपस्थित होते. या प्रवेशासाठी कॉलेज कक्षाचे सचिव वैभव मोहिते यांनी विशेष प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे काही प्राध्यापक आणि प्राचार्य यांनी युवासेना प्रवेश केला होता.