वन विभागातर्फे पर्यावरण दिन साजरा

। कोर्लई । वार्ताहर ।

शासनाच्या वन विभागातर्फे मुरुड व रोहा तालुक्यातील चणेरा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जागतिक पर्यावरण दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवशी त्या गोष्टीबद्दल जागरूक केले जाते. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो. याचाच भाग मुरुड तसेच रोहा तालुक्यातील चणेरा येथे यादिवशी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वनविभागाचे चणेरा येथील वनपाल आर.जी.गायकवाड, वनरक्षक गोविंद खेडकर, त्रिभूवन, वनपाल विलास वाघमारे, वनपाल संतोष रेवणे, वनमजूर दिलिप पवार, दिनेश रोटकर, अनिल चोरघे व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Exit mobile version