| कोर्लई | प्रतिनिधी |
रायगडच्या युवक फाऊंडेशनने तालुका स्तरीय निबंध स्पर्धेचे शुक्रवारी (दि.2) आदर्श पतसंस्थेच्या सभागृहात आयोजन केले होते. या स्पर्धेत आरसीएफ जनरल अरुण कुमार वैद्य, पी.एन.पी. हायस्कूल व जे.एस.एम कॉलेजच्या 52 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी गट पहिला प्रथम क्रमांक प्रभा पाटील (जेएसएम कॉलेज), गट दुसरा प्रथम क्रमांक श्रावणी थळे, दुसरा क्रमांक ऋग्वेद बेलोसकर (जनरल अरुण कुमार वैद्य), तृतीय क्रमांक श्लोक नागे (आरसीएफ), गट तिसरा प्रथम क्रमांक समृद्धी जगे (आरसीएफ), दुसरा क्रमांक आराध्या भोईटे (आरसीएफ) तृतीय क्रमांक कनिष मगर (जनरल अरुण कुमार वैद्य) यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे चंद्रकांत पाटील, डॉ.रसिका पाटील, प्रा. डॉ.जयपाल पाटील, तपस्या गोंधळी, सत्यम पाटील उपस्थित होते.







