माणगावात बौद्ध धम्म समितीची स्थापना

। माणगाव । वार्ताहर ।
माणगावात सामाजिक कार्यकर्ते पंकज रवींद्र तांबे यांनी पुढाकार घेऊन बौद्ध धम्म समितीची स्थापना करून या समितीमार्फत आपण विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. माणगाव येथे पंकज तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन माणगाव बौद्ध धम्म समिती स्थापन केल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के, सरचिटणीस संभाजी गायकवाड, सदस्य सुजित गायकवाड, साहिल गायकवाड यांच्यासह स्वराज्य संघटनेचे चिटणीस रवींद्र मांजरे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे यांनी सांगितले कि, हि समिती स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हि समिती रायगडसह महाराष्ट्रात विशेष करून काम करणार आहे. बहुजन समाजातील गरीब गरजू, सर्वसामान्य समाज बांधवांना शासकीय योजनांची माहिती पुरविणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांना हि समिती प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version