रायगड जिल्ह्यात छावा क्रांतिवीर सेनेची स्थापना

जिल्हाध्यक्षांसह विविध तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

। बोर्लीपंचतन । मकरंद जाधव ।
महाराष्ट्रातचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यातील क्रांतीकारी भुमी शिरढोण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारक स्थळाला भेट देत त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करुन त्यांच्या समाधीस्थळाजवळ वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम राज्यात पुर व दरड कोसळुन झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनेची ध्येयधोरणाबद्दल माहीती देताना सांगीतले की “छत्रपतींनी या रायगड जिल्ह्यात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्यांचा कर्तबगार शुर पुत्र धर्मविर छत्रपती संभाजी राजांच्या नावाने आपली संघटना कार्यरत आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातुन शेतकरी,कामगार,विद्यार्थी महिला यांसह वंचित नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे प्रथम कर्तव्य समजुन ते सोडविण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे,जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे आपण आवाज उठवला पाहिजे व शोषितांना न्याय मिळवून दिला पाहिजे”
यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष व विविध तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देउन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांसह केंद्रीय कार्याध्यक्ष नवनीत महाराज गोरले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम,आरोग्यदूत तुषार जगताप माजी नायब तहसीलदार दिलीप दळवी, सरपंच साधनाताई कातकरी,सामाजिक कार्यकर्त्या साधनाताई वाजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version