शेतकरी संघटनेची स्थापना

| तळा | वार्ताहर |

शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा आणि कमी होत असलेला विरोधकांचा आवाज या पार्श्‍वभूमीवर तळा तालुक्यातील शेतकरी संघटीत झाला असून, शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी या संघटनेस पाठिंबा दिला असून, या संघटना एकत्रित काम करणार आहेत. शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी माजी उपसभापती चंद्रकांत राऊत, उपाध्यक्षपदी रवींद्र मांडवकर, सचिवपदी कैलास पायगुडे, सह सचिवपदी कमलाकर मांगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version