जैन समाज श्री ज्ञान संस्कार वाटिकाची कर्जतमध्ये स्थापना

। कर्जत । प्रतिनिधी ।
जैन समाजाच्या लहान मुलांना संस्कारक्षम जीवन जगण्यासाठी कर्जत मध्ये जैन समाजाच्या श्री ज्ञान संस्कार वाटीकाची स्थापना करणात आली. कर्जतमधील पुण्योदय सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री ज्ञान संस्कार वाटिका ची स्थापना करण्यात आली. यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष जयतीलाल परमार, रणजित जैन, रमेश ओसवाल या विश्‍वस्तांसह जिग्नेश ओसवाल, सचिन ओसवाल, पंकज ओसवाल आणि जैन भगिनी उपस्थित होत्या.

श्री ज्ञान संस्कार वाटिका यांचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. कर्जत येथील शाखा ही भोसरीला संलग्न आहे. या संस्कार वाटिका मध्ये एकूण 37 मुले आणि मुली सहभागी झाल्या आहेत. या श्री ज्ञान संस्कार वाटिकामध्ये लहान मुलांना जैन समाजाचे बद्दलची माहिती तसेच समाजात कसे वावरायचे, जीवनामध्ये उपयोगी पडणारे अनेक माहिती आदी संस्कार दिले जाणार आहेत.

वाटिका शिक्षक संघाच्या अध्यक्षा म्हणून आशा ओसवाल, उपाध्यक्ष भावना परमार तर सदस्या म्हणून वीना जैन, संगीता जैन, किर्ती जैन, कोमल बाफना, सोनु ओसवाल, कुश ओसवाल, लता हिंगड, आयुषी जैन, मीना ओसवाल, रीना ओसवाल, सीमा ओसवाल, हर्ष ओसवाल यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version