विद्यार्थ्यांचा विकास साधणार: रत्नाकर पाटील
। तळा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील परिषदेच्या होतकरू शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी रायगड टायलेंट रीसर्चची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून, विद्यार्थांमधील बौद्धिक क्षमतेचा असलेला विकास पाहून किंवा त्या विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकतो. भविष्यात आपले करिअर घडू शकेल या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना उच्च विद्याविभूषित रत्नाकर तु. पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आली.
संपूर्ण रायगडमधील विद्यार्थी घडला पाहिजे, त्याला पूर्ण शिक्षण घेता यावे, हा या सहकारी शिक्षक वर्गाचा सहभाग हेतू आहे. अल्प शिक्षणावर न थांबता उद्दिष्ट समोर ठेवले तर शक्य होऊ शकते, असे रत्नाकर पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. या संस्थेची सर्वसाधारण सभा नागोठणे येथे नुकतीच झाली. यावेळी कार्यकारिणीची निवड व जिल्हा मुख्य समिती निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष अमिष महादेव भौड (तळा), उपाध्यक्ष मानसी मिलिंद भोसले (पनवेल), उपाध्यक्ष मुकेश रमेश भोस्तेकर (माणगाव), सचिव संजय मुरलीधर पाटील (पनवेल), सहसचिव उमेश सीताराम ठाकूर (अलिबाग), खजिनदार जनार्दन नाना भिलारे (सुधागड), सहखजिनदार अनिल राणे (सुधागड), सदस्य रत्नाकर तुकाराम पाटील (पोलादपूर), विवेकानंद भवानजी पोटे (रोहा), राकेश दादाजी अहिरे (पेण), दिलदार बाळाराम थळे (अलिबाग), मित्तल सुहास वावेकर (तळा), निलेश तुकाराम गारगोटे (खालापूर) यांचा समावेश आहे.