। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे उपशिक्षक निवास गावंड आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, कडापे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, पट्टी, त्याचबरोबर शालेय पोषण आहारासाठी लागणार्या डिशचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसावर नाहक खर्च करण्यापेक्षा शालेय गरीब गरजू विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्यास विद्यार्थ्यांना शाळेची व अभ्यासाची गोडी लागते. चिमुकल्यांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद आम्हाला आमच्या वाढदिवसापेक्षा मोठा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हितेंद्र म्हात्रे यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर गावंड, निवास गावंड, शंकर पाटील, विनायक गावंड, संतोष म्हात्रे, वत्सला म्हात्रे तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.