सत्यशोधक समाजच्या विचारसरणीने शेकापची स्थापना

ऑनलाईन व्याखानामालेत  प्रा. एस. व्ही. जाधव यांचे प्रतिपादन
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष हा 1946 च्या काळात काँग्रेसमध्ये शेतकरी कामगार संघ म्हणून काम करत होता. पण जेव्हा त्या काळातील शेकापच्या नेत्यांना कळले की काँग्रेस शेतकरी आणि कामगारांसाठी काम करणार नाही तेव्हा त्यांनी शेतकरी कामगार पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला जो महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारधारेवर आधारित आहे. शेकाप नेते शेतकर्‍यांचे आणि कामगारांचे नेते आहेत, अशी माहिती प्रा. एस. व्ही. जाधव यांनी ऑनलाईन व्याख्यानमालेत दिली.

शेकाप युवा कार्यकर्ता व अभ्यास शिबिरांंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे सातव्या व्याख्यानाचे आयोजन रविवारी 20 जूनला करण्यात आले होते. या याख्यानमालेचा विषय होता सत्यशोधक समाज आणि भारतीय शेतकरी कामगार पक्ष. ज्येष्ठ शेकाप नेते, चिटणीस मंडळ सदस्य प्रा. एस. व्ही. जाधव सत्राचे प्रमुख वक्ते होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शेकाप मध्यवर्ती समिती सदस्य भारत पाटील होते. या ऑनलाईन व्याख्यानमालेत साम्या कोरडे, बाबासाहेब देशमुख, राजेंद्र कोरडे, अ‍ॅड. सुनिल सोमवंशी, अ‍ॅड. राजेंद्र नवले आदी सहभागी झालेले होते.

प्रा. एस. व्ही. जाधव म्हणाले की, सत्यशोधक समाज आणि शेतकरी कामगर पक्ष हा एक अतिशय विस्तृत विषय आहे.  तथापि,या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला महात्मा फुलेंचा इतिहास आणि त्याने सत्यशोधक समाज चळवळ कशासाठी सुरू केली याचा थोड्या प्रमाणात माहिती असणे आवश्यक आहे. सावकारांकडून शेतकर्‍यांचे शोषण, ब्राह्मणवादाविरोधात लढा, अस्पृश्यांवर शिक्षण बंदी घालणे, इत्यादी समाजात असलेल्या सामाजिक कुप्रथांना विरोध करण्यासाठी त्यांनी ही चळवळ सुरू केली.  नंतर दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे या लोकांनी ही चळवळ पुढे सुरु ठेवली. स्वातंत्र्यानंतर शंकरराव मोरे, केशवराव जेधे या नेत्यांसह शेतकरी आणि कामगार पक्षाची स्थापना झाली. मार्क्सिसिम आणि कम्युनिझम या विचारसरणीचे अनुसरण केले.असे ते म्हणाले.

 शेकापने शेतकरी, कामगार, समाजातील दुर्बल घटकांसाठी आणि सामाजिक अन्यायविरोधात सातत्याने आवाज उठवून महाराष्ट्राच्या राजकारणातील पोकळी भरुन काढली आहे. शेतीविषयक कायद्यांचा निषेध असो वा घटनात्मक मूल्ये जपणे असो शेकाप सातत्याने काम करीत राहिल.
–  प्रा. एस. व्ही. जाधव

Exit mobile version