पोयनाडमध्ये सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल बँकेची उभारणी

भाई जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

| पेझारी | प्रतिनिधी |

पोयनाड बाजारपेठेत नव्याने सुरु झालेल्या सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, गोल्ड लोन बँकेचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.19) पार पडले. पोयनाड बाजारपेठेतील प्रमोद राऊत यांच्या जागेत या बँकेची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान, उद्घाटनानंतर भाई जयंत पाटील यांनी बाजूलाच असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेला भेट देऊन त्याठिकाणी बँकेच्या व्यवस्थापकांच्या मागणीनुसार बँकेला दहा -दहा कोटी रुपयांच्या ठेवी देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी प्रमोद राऊत, माजी सरपंच कल्पना राऊत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, पोयनाडचे माजी सरपंच करण जैन, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, रायगड बाजारचे चेअरमन प्रमोद घासे, पोयनाड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, विलास म्हात्रे, कमळाकर वाघमोडे, विकास पाटील, हरीश कदम यांच्यासह ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नव्या शाखेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जयंत पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत व टाळ्यांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शेकाप कार्यकर्ते दिगंबर म्हात्रे, मोहन धुमाळ, बाळाराम दांडेकर, राजन पाटील, विजय नारायण पाटील, मोहन म्हात्रे, जी.एच. पाटील, शैलेश पाटील, वैकुंठ पाटील, राजन पांचाळ, प्रकाश म्हात्रे, मोहन मंचुके, अनिल पाटील, संतान पाटील, दिनेश पाटील, शैलेश गायकवाड, कल्पना चवरकर, त्याचप्रमाणे येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुप्रा पॅसिफिक फायनान्सियल बँकेचे मुख्य व्यवस्थापक मितेश टेमकर, मीनाक्षी भोळे, बिंदुमे दीपक फ्रान्सिस यांनी जयंत पाटील यांचे व उपस्थितांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.

Exit mobile version