अपुर्‍या जागेतही न्यायदानाचे काम काम वाखाण्याजोगे

न्या. मिलिंद साठ्ये यांचे प्रतिपादन

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन येथील न्यायालय मागील चार दशकांपासून भाड्याच्या व अपुर्‍या जागेत काम करत असून, त्या ठिकाणी काम करणारे न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी व वकील यांचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रायगड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांनी केले.

श्रीवर्धन वकील संघटनेने सातत्याने नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केल्याने, तत्कालीन अर्थमंत्री ना. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथील दिवाणी व कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा व निधी मंजूर केला होता. या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. 23 एप्रिल रोजी न्या. साठ्ये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा मुख्य न्यायाधीश शैलजा सावंत, जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे, माणगाव येथील जिल्हा न्यायाधीश कोल्हे, श्रीवर्धन न्यायालयाच्या न्यायाधीश सोनाली जवळगेकर यासह रायगड जिल्ह्यातील विविध न्यायाधीश, त्याचप्रमाणे वकील उपस्थित होते.

श्रीवर्धन शहरातील गणेश आळी परिसरात प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन विधिवत पध्दतीने गणेश पूजन करुन करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद शाळा क्रमांक एक च्या समोर असलेल्या कुळकर्णी भाई बिरादर हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीवर्धन वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष वढावकर यांनी प्रस्ताविक केले. त्यानंतर रायगडच्या प्रमुख न्यायाधीश शैलजा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नवीन बांधण्यात येणारी इमारत ही न्यायद्यानाचे पवित्र कार्य करण्यासाठी तयार होत असून, त्याप्रमाणे त्या इमारतीचे स्वरूप तयार करावे असे देखील त्यांनी सांगितले. यानंतर श्रीवर्धन न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सोनाली जवळगेकर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Exit mobile version