| कोलाड | वार्ताहर |
विधानसभा निवडणुकीला चार दिवस राहिले तरी अद्यापही मतदान ओळखपत्र कार्ड मिळाले नसल्याची खंत मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे निवडणूक अधिकार्यांना मतदारांना जबाब द्यावा लागत आहे.
मतदान ओळख पत्रात अनेख त्रुटी दिसून येत आहेत. यामध्ये कोणाच्या नावात बदल, तर कोणाच्या फोटोत बदल, तर कोणाच्या वयात बदल झाल्यामुळे याचा जबाब निवडणूक अधिकार्यांना द्यावा लागत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तर यावरून विविध ठिकाणी वाद होत असल्याचे दिसून येते. अनेक वेळा विविध त्रुटींविषयी फॉर्म भरूनही मतदान ओळखपत्र मिळत नाही.
प्रत्येक गावातील शिक्षकांनी मतदान ओळख पत्राच्या त्रुटीविषयी एक-एक मतदाराचे तीन-तीन वेळा फॉर्म भरूनही अद्यापही ओळख पत्र मिळाले नाही. यामुळे मतदार व निवडणूक यांच्यात वाद होतात. तरी शासकीय अधिकार्यांकडून नवीन ओळखपत्र मिळत नाही. याचा नाहक त्रास मतदारांना भोगावा लागत असून, यामुळे वाद विकोपाला जातो. याला जबाबदार कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.