मंदिरे बंद असली तरी आरोग्यमंदिरे सुरु आहेत

। कल्याण । वार्ताहर ।
आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण येथे केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला अप्रत्यक्षरित्या सुनावलं. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ पकडत त्यांनी भाजपा नेत्यांना अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या.

फेरीवाल्यांबाबत कठोर
दुसरीकडे त्यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्याला हात घालत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. मधल्या काळात जी काही घटना ठाण्यामध्ये घडली. त्यामुळे येत्या काळात आपल्याला कठोरपणे कायदा राबवावा लागेल. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही. नागरिक, माता भगिनी आणि कर्मचार्‍यांची सुरक्षा आपल्यावर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी जर फेरीवाल्यांचा उच्छाद असेल. तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. त्या दिशेने काम हे आपल्याला करावं लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Exit mobile version