। पल्लेकेले । वृत्तसंस्था ।
तीन वर्षांनंतर राष्ट्रीय संघासाठी वन डे मॅच खेळणार्या एव्हिन लुईसने तिसर्या सामन्यात श्रीलंकेची धुलाई केली. त्याने 61 चेंडूत 102 धावांची नाबाद खेळी करताना चार षटकार आणि नऊ चौकार लगावले.
लुईसच्या शतकाला साथ मिळाली ती शेरफेन रुदरफोर्डच्या 26 चेंडूंत 50 धावांची. श्रीलंकेने 23 षटकांत 3 बाद 156 धावा केल्या होत्या, परंतु नियमानुसार वेस्ट इंडिजसमोर 195 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. श्रीलंकेने ब्रँडन किंग आणि शेई होप यांना स्वस्तात माघारी पाठवले. पण, लुईस आणि किंगने एक षटक आणि 8 विकेट्स राखून संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेची सुरुवात संथ झाली होती. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि पाथुम निसांका यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 47 धावा जोडल्या होत्या.पावसाची शक्यता असतानाही या दोन सलामीवीरांनी संथ खेळ सुरूच ठेवला. त्यांनी 17 षटकांत 81 धावाच फलकावल चढवल्या होत्या. 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फर्नांडोला रोस्टन चेसने माघारी पाठवले. त्यानंतर पाऊस आल्याने खेळाडूंना मैदान सोडावे लागले. बराच वेळ पाऊस पडल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.