| अलिबाग | विशेष प्रतिनिधी|
स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार ना.का. भगत जन्मशताब्दी समारंभ समिती व अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस पक्षाचे माजी आमदार ना.का. भगत यांची 100 वी जयंती सोमवार, दि. 16 मे रोजी सकाळी 11 वाजता भाग्यलक्ष्मी हॉल, चेंढरे-अलिबाग येथे साजरी करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जन्मशताब्दीचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांच्या हयात विधवा पत्नींचा व ना.का. भगत यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे काम केलेल्या 80 वर्षांवरील हयात ज्येष्ठ काँग्रेसजनांचा मानसन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तरी, आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन या समारंभ समितीचे प्रमुख निमंत्रक अॅड. जे.टी. पाटील व सुकुमार भगत यांनी केले आहे.