कर्जत तालुक्यात चार केंद्रावर परीक्षा

| नेरळ | वार्ताहर |

उच्च माध्यमिक परीक्षा बुधवारी (दि.21) सुरू झाली आहे. कर्जत तालुक्यात कर्जत अभिनव प्रशाला, नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, नेरळ येथील हाजी लियाकत ज्युनियर कॉलेज आणि कशेले येथील भाऊसाहेब राऊत कनिष्ठ महाविद्यालय येथे परीक्षा घेतली जात आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत एकूण 2579 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. कर्जत अभिनव प्रशाला येथे 936 विद्यार्थी तर नेरळ येथील विद्या मंदिर शाळेच्या केंद्रावर 711, नेरळ येथील हाजी लियाकत केंद्र येथे 227 आणि कशेले येथील भाऊसाहेब राऊत शाळा येथील केंद्रावर 705 विद्यार्थी परीक्षा देत आहेत अशी माहिती कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष दोड यांनी दिली आहे. सर्व केंद्रावर कर्जत आणि नेरळ पोलीस यांच्याकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॉपी नियंत्रण पथक तैनात करण्यात आली आहेत.

परीक्षेसाठी कर्जत येथील अभिनव प्रशाला येथे मुख्य कस्टडी असून तेथे कस्टडीयन म्हणून ई. जी. म्हात्रे तर सहायक म्हणून नलिनी साळोखे यांच्यावर जबाबदारी आहे. मुख्य केंद्रातून प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये पोलीस बंदोबस्त प्रश्‍नपत्रिका नेण्याची जबाबदारी रनर म्हणून प्रा.बोरसे नेरळ कनिष्ठ महाविद्यालय, संतोष शिंदे हाजी लियाकत ज्युनियर कॉलेज, प्रा. अंकिता साबळे अभिनव प्रशाला आणि विशाल पोटे काशेले भाऊसाहेब राऊत कनिष्ठ महाविद्यालय अशी जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

Exit mobile version