| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आपल्या संविधानाची खर्या अर्थाने सगळ्यांना ओळख व्हावी या हेतूेने संविधान गौरव परीक्षा 2021 चे आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा तोंडरे येथे 27 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी शाळेतील इयत्ता 6 वी ते 8 वीच्या 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोरोनाबाबत सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सदर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. वाघ यांनी मुलांचे कौतुक करून आपले विचार मांडले. यावेळी वर्गशिक्षक राजेश मोकल, वसंत मोकल, राजेंद्र खामकर आणि बालाजी जकाकूरे यांनी मनोगत व्यक्त केले. ही परीक्षा पार पाडण्यासाठी प्रभात नाईक यांची या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून मुंबईच्या तळवटकर प्रतिष्ठान या संस्थेकडून नियुक्ती करण्यात आली होती. योग्य नियोजन करून परीक्षा संपन्न झाली. यावेळी श्री. खामकर, जकाकुरे आणि बोरकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले होते. या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभात नाईक यांनी, तर आभार अतुल बोरकर यांनी मानले. यावेळी महेंद्र जोशी, तुकाराम शिंदे, मोमीन मॅडम, विद्या गावंड, कल्पना गावंड आणि संध्या म्हात्रे उपस्थित होत्या.